कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी निधी गोळा केला पाहिजे आणि त्यासाठी भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिकेचे आयोजन करण्याची मागणी शोएब अख्तरने केली होती. पाकिस्तानच्या माजी गोलंदाजाचा प्रस्तावावर भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी चांगलाच समाचार घेतला होता. कपिल देव यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला सुनावले आहे.
‘स्पोर्ट्स तक’शी बोलताना कपिल देव म्हणाले, ‘भारत-पाकिस्तान सामन्यांपेक्षा मुलांचे शाळेत जाणे गरजेचे आहे. पाकिस्तानला एवढीच पैशांची चणचण आहे, तर त्यांनी प्रथम सीमेवरील दहशदवाद बंद करावा. त्याच पैशांनी त्यांनी शाळा आणि हॉस्पिटल बांधावेत. क्रिकेट हा खूप नंतरची गोष्ट आहे. शाळेत जायला मिळत नसलेल्या मुलांची मला दया येते. शाळा-कॉलेजची उभारणी करा. क्रीडा स्पर्धा काय होतच राहतील, असा सल्ला त्यांनी दिला आहे.