कोरोनासाठी सार्क राष्ट्रांनी आपत्कालीन निधी उभारा; मोदींनी दाखविली १ कोटी डॉलरची तयारी

0

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा जगभर फैलाव होत आहे. याचा अर्थव्यवस्थेला मोठा धोका पोहोचला आहे. कोरोना बाधितांचा आकडा लाखांच्या घरात आहे. भारतातही केंद्र सरकारकडून योग्य ती खबरदारी घेतल्या जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या महारोगराईपासून देशाची व जगाची सुटका करण्यासाठी अभियान सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर आज रविवारी मोदींनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे सार्क राष्ट्रांच्या नेत्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सार्क राष्ट्रांना कोरोनाशी एकत्रितपणे लढण्याची गरज असल्याचे सांगितले. यासाठी आकस्मिक निधी उभा करण्याचे सर्व राष्ट्रांना आवाहन करत, भारताकडून यासाठी १ कोटी डॉलरचा निधी देण्याची घोषणा केली आहे. या चर्चेत पंतप्रधान मोदींसह श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, मालदीव, भूतान व नेपाळ या राष्ट्रांच्या प्रमुखांचा सहभाग आहे.

करनो व्हायरसशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सार्क राष्ट्रांना एकत्र करत # COVID19 साठी आपत्कालीन निधी तयार करण्याचा प्रस्ताव मांडला. शिवाय, भारताकडून यासाठी एक कोटी डॉलरची मदत दिली जाणार असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.