नवी दिल्ली: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत आहे. शासनाकडू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय केले जात आहे. मात्र तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान देशातील वाढत्या कोरोनाच्या आकडेवारीवरून आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. ही बैठक सुरू झाली असून यात सर्वपक्षीय नेते हजर आहे. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांचे विचार ऐकले जाणार असून मागणी आणि सूचनांचा विचार केला जाणार आहे. या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मेडीकलच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा ही उपयोग मनुष्यबळ म्हणून करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तसेच कंटेन्मेंट झोनमधील कोरोनाबाधित कुटुंबियांना दहा हजाराची मदत देण्यात यावी अशी मागणी देखील काँग्रेसने केली आहे.