कोरोना इफेक्ट : हाताला काम नसल्याने बेरोजगार वळले भाजीपाल्यासह फळ विक्रीकडे

0

खिर्डी (सादीक पिंजारी) : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने लोकडाऊन घोषित केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व व्यवसाय व दुकाने सुमारे महिन्यापेक्षा अधिक काळापासून बंद आहेत शिवाय उद्योगधंदे ठप्प झाल्याने अनेकांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे तर छोट्या-मोठा व्यवसाय करणार्‍यांनपी कुटुंबाचा प्रपंच चालवण्यासाठी भाजीपाला तसेच फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. ग्रामीण भागात दारोदारी जावून भाजीपाला व फळांची विक्री केली जात असून त्या माध्यमातून मिळणार्‍या उत्पन्नातून कुटुंबाचा रहाटगाडा चालवला जात आहे.

हातावर पोट भरणार्‍यांचे अधिक हाल
सलुनख, ब्युटी पार्लर, फुलांची दुकाने, पान विक्री, चहा विक्री, पान टपर्‍या, परीट, ड्रायक्लीनर, हमाल, हॉटेल व्यावसायीक, रीक्षा चालक तसेच विविध दुकानांवर काम करणार्‍यांच्या हाताला महिनाभरापासून हाताला काम नसल्याने प्रपंच चालवण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. खिर्डी गावात मंगळवारी आठवडे बाजारात भाजीपाल्यासह इतर सामानाची शेकडो दुकाने थाटली जातात व छोट्या-मोठ्या व्यवसायातून अनेक जण आपल्या प्रपंपाचा गाढा ओढतात मात्र महिनाभरापासून आठवडे बाजारही बंद झाल्याने रोजगार हिरावला गेल्याने अनेकांनी आपला मुख्य व्यवसाय सोडून फळे आणि भाजीपाला विक्री सुरू केली आहे. कमी भांडवलात व्यवसाय करता येत असल्याने व जीवनावश्यक बाब म्हणून या बाबीकडे पाहिले जात असल्याने या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे.

सलून चालकाकडून भाजीपाला विक्री
खिर्डीतील माऊली सलूनचे मालक नितीन सोनवणे हे आपला व्यवसाय बंद असल्याने सकाळ-सायंकाळ दारोदारी जाऊन फळे आणि भाजीपाला विकताना दिसत आहे. बदलत्या परिस्थतीशी जुळवून घेत रावेर तालुक्यातील अनेक जण आपला जुना व्यवसाय बदलून गुजराण करीत असल्याचे चित्र आहे.

उदरनिर्वाहाचा प्रश्‍न कठीण -नितीन सोनवणे
सलून व्यावसायीक असलोतरी महिनाभरापासून दुकान बंद असल्याने व प्रपंच चालवण्याचे संकट उभे राहिल्याने आता दुकचावरून फळे तसेच भाजीपाला विकण्याचा निर्णय घेतला असून आलेल्या परीस्थितीला तोंड देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नितीन सोनवणे म्हणाले.