भुसावळ : कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून धावणार्या तब्बल 18 एक्स्प्रेस गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची होत असलेली गर्दीतून व्हायरसचा फैलाव टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, काही गाड्या 31 मार्च तर काही गाड्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रद्द झाल्या आहेत.
18 एक्स्प्रेस गाड्या झाल्या रद्द
डाऊन 11201 लोकमान्य टिळक-अजनी एक्स्प्रेस वाया मनमाड ही गाडी 23 ते 30 मार्च दरम्यान रद्द करण्यात आली आहे. अप 11202 अजनी -लोकमान्य टिळक व्हाया नांदेड-मनमाड ही गाडी 20 ते 27 मार्चदरम्यान रद्द करण्यात आली. डाऊन 11401 डाउन मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस 23 मार्च ते 1 एप्रिलदरम्यान रद्द करण्यात आली. अप 11402 नागपूर- मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस 23 ते 31 मार्च दरम्यान रद्द करण्यात आली आहे. डाऊन 11417 पुणे-नागपूर हमसफर एक्स्प्रेस 26 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान रद्द करण्यात आली आहे. अप 11418 नागपूर-पुणे हमसफर एक्स्प्रेस 20 ते 27 मार्चदरम्यान तर डाऊन 12117 लोकमान्य टिळक-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस 18 ते 31 मार्चदरम्यान रद्द करण्यात आली आहे. अप 12118 मनमाड-लोकमान्य टिळक गोदावरी एक्स्प्रेस 18 ते 31 मार्चदरम्यान रद्द करण्यात आली आहे. डाऊन 22139 पुणे-अजनी एक्स्प्रेस 21 ते 28 मार्चदरम्यान रद्द करण्यात आली आहे. अप 22140 अजनी-पुणे एक्स्प्रेस 22 ते 29 मार्चदरम्यान रद्द करण्यात आली आहे. डाऊन 22221 डाउन मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस 20, 23, 27 व 30 मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे शिवाय अप 22222 हजरत निजामुद्दीन – मुंबई राजधानी एक्स्प्रेस 21, 24, 26 व 31 मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे. डाऊन 12261 मुंबई-हावडा दुरांतो एक्स्प्रेस 25 मार्च व 1 एप्रिल रोजी रद्द करण्यात आली आहे. अप 12262 हावडा-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस 24 व 31 मार्च रोजी रद्द करण्यात आली. डाऊन 22111 भुसावळ-नागपुर इंटरसिटी एक्स्प्रेस वाया इटारसी ही गाडी 18 ते 29 मार्च दरम्यान रद्द करण्यात आली आहे. अप 22112 नागपूर-भुसावळ इंटरसिटी एक्स्प्रेस व्हाया इटारसी ही गाडी 19 ते 30 मार्चदरम्यान रद्द करण्यात आली आहे. डाऊन 11205 लोकमान्य टिळक-निजामाबाद एक्स्प्रेस व्हाया मनमाड ही गाडी 21 व 28 मार्चला रद्द करण्यात आली. अप 11206 निजामाबाद- लोकमान्य तिलक एक्स्प्रेस व्हाया मनमाड ही गाडी 22 मार्च व 29 मार्चला रद्द करण्यात आली आहे.