कोरोना काळात मतदारसंघासाठी एक कोटी 16 लाख खर्च
रावेर-यावल तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी यांची माहिती : शववाहिकेसह रुग्णवाहिकेचीही खरेदी
रावेर : कोरोना काळात मतदारसंघातील जनतेच्या आरोग्यासाठी एक कोटी 16 लाखांचा निधी खर्च केला. यात सॅनिटायझर, मास्क, अॅन्टीजन टेस्ट तसेच इतर आरोग्य औषधांची खरेदी करण्यात आला तसेच आवश्यक साहित्य स्वरुपात रुग्णालयाला देण्यात आल्याचे आमदार शिरीष चौधरी म्हणाले. आमदार कार्यलायाकडून मिळालेल्या माहितीनुसार रावेर व यावल तालुक्यात आमदार निधीतून एक कोटी 16 लाख 27 हजार 667 रुपयांचे साहित्य खरेदी करून रुग्णालयांना देण्यात आले. यात शववाहिका व रुग्णवाहिकेचा समावेश आहे.तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणाले की, साहित्य स्वरुपात मदत झाली तसेच याच काळात अनेकांनी लोकवर्गणी करून सुध्दा रुग्णालयांना साहित्य इतर औषधी दिली.
कोरोना काळात यावलसाठी 73 लाख
कोरोना काळात आमदार निधीतून यावल तालुक्यात 73 लाख 89 हजार 746 रुपयांची साधन सामुग्री वाटप करण्यात आली. यामध्ये रुग्णवाहिका, शववाहिका, मास्क, अँटीजन टेस्ट किट्स, सॅनिटायझर, इतर साहित्य आमदार निधीतुन देण्यात आले.
कोरोना काळात रावेरसाठी 42 लाख
कोरोना काळात आमदार निधीतून रावेर तालुक्यातील जनतेसाठी 42 लाख 37 हजार 921 रुपयांची साधन सामग्री वाटप करण्यात आली. यात मास्क, अँटीजनटेस्ट किट्स व सॅनिटायझरसह इतर साहित्याचा समावेश होता. हे साहित्य रावेर व पाल रुग्णालयांना देण्यात आले. यात एक शववाहिनी आहे तर रावेर नगर पालिकेला सुध्दा अँटीजनटेस्ट किट्स साठी तीन लाखांचा निधी देण्यात आल्याची आमदार कार्यालयाकडून सांगण्यात आले
भयावह परीस्थिती कधीही पाहिली नाही : आमदार चौधरी
कोरोना काळात इतकी भयावह परीस्थिती कधी बघितली नाही. रावेर व यावल मतदारसंघात आम्ही कोरोना काळात जनतेला जेवणाची व्यवस्था केली. सुमारे एक करोडच्यावर निधी रुग्णालयांना उपलब्ध करून दिला. किराना किट्स व मास्क, अँटीजन जनतेला वाटले. अजुनही कोरोना संपला नाही. पुढील लाट लहान मुलांवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे काळजी घेण्याचे अवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी केले आहे.