नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे वाढते रुग्ण, ढासळलेली आर्थिक परिस्थितीवरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष केले आहे. मोदी सरकारच्या कामगिरीमुळे जीडीपी २३ टक्क्यांनी खाली गेले आहे असे आरोप राहुल गांधींनी यापूर्वी केली आहे. भारत-चीन संबंधावरून देखील राहुल गांधींनी मोदींना लक्ष केले आहे. चीनने भारताची भूमी बळकावले आहे, मात्र मोदी ते मान्य करत नसल्याचे राहुल गांधींनी सांगितले. दरम्यान आता पुन्हा राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. कोरोना काळात भाजप सरकारने अनेक ‘खयाली पुलाव’ बनविले. मात्र त्यातून काहीही साध्य झाले नाही हे स्पष्ट झाल्याचे आरोप केले आहे. ट्वीटरवरून राहुल गांधींनी निशाणा साधला आहे.
कोरोना काल में भाजपा सरकार ने एक से एक ख़याली पुलाव पकाए:
▪️21 दिन में कोरोना को हरायेंगे
▪️आरोग्य सेतु ऐप सुरक्षा करेगा
▪️20 लाख करोड़ का पैकेज
▪️आत्मनिर्भर बनो
▪️सीमा में कोई नहीं घुसा
▪️स्थिति संभली हुई हैलेकिन एक सच भी था:
आपदा में ‘अवसर’ #PMCares— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 16, 2020
“कोरोनाच्या संकटात मोदी सरकारने खयाली पुलाव केले. 21 दिवसांमध्ये कोरोनावर मात करू, आरोग्य सेतू अॅपमुळे संरक्षण होईल, 20 लाख कोटींचे पॅकेज, आत्मनिर्भर व्हा, सीमेवर कोणीही घुसखोरी केली नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यातच एक सत्य संकटात संधी म्हणजे पीएम केअर फंड’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
काल मंगळवारी ट्वीट करून राहुल गांधींनी भारत-चीन संबंधावरून मोदींना लक्ष केले होते. काल संसदेत बोलतांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनने भारताच्या भूमीवर अतिक्रम केले आहे अशी माहिती दिली, यावरून राहुल गांधींनी मोदींकडून देशाची दिशाभूल करण्यात आल्याचे आरोप केले होते.