कोरोना: गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद; दिली महत्त्वाची माहिती

0

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सनीटायझर आणि मास्कची आवश्यकता भासत आहे. मात्र या परिस्थितीत काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कडक शब्दात इशारा दिला आहे. काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे.

नवीन येणाऱ्या कैद्यांची तपासणी करण्यात याव्यात व त्यांना अलिप्त ठेवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. सरकारच्या आदेशाचे पालन करावे, आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.

लग्न समारंभ घरगुती पद्धतीने गर्दी न करता करावे याबाबतही त्यांनी आवाहन केले आहे.