कोरोना तपासणी, उपचार अन् लसीकरणात दिव्यांगांना प्राधान्य
राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे सहसचिवांचे आदेश
जळगाव – कोरोना तपासणी, उपचार आणि लसीकरणासाठी दिव्यांगांना रांगेत उभे रहावे लागत असल्याची बाब निदर्शनास आली होती. त्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव यांनी कोरोना तपासणी, उपचार आणि लसीकरणासाठी दिव्यांगांना प्राधान्य देण्याचे आदेश आज दिले आहेत.
जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शासनाकडुन कोरोना संशयित, बाधितांना त्वरीत उपचार मिळावे यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. अशातच दिव्यांगांना कोरोना तपासणी, उपचार आणि लसीकरण यासाठी तासन्तास रांगेत उभे रहावे लागत असल्याची बाब निदर्शनास आली होती. सर्वसामान्यांच्या तुलनेत दिव्यांगांची प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना तपासणी, उपचार आणि लसीकरणात त्रास होण्याची अधिक शक्यता असते. ही बाब लक्षात घेता सर्व जिल्हा प्रशासनांनी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, उपचार आणि लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे असे आदेश सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दि.रा. डिंगळे यांनी दिले आहे.