नंदुरबार: जळगाव येथील कोरोना रुग्णाचा वैद्यकीय अहवाल सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी नंदुरबार येथील कामनाथ नगरमधील एका जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर. एल.पाटील असे त्या व्यक्तीचे नाव असून या इसमाने जळगाव येथील कोरोना बाधित व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल लक्ष्मीनारायण नगर व्हाट्सएपग्रुपवर प्रसारित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.