ट्रेस, टेस्ट आणि ट्रीटमेंट यावर भर देणार
जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येणाºया संशयित रुग्ण शोध पंधरवाड्यात त्वरित निदान, त्वरीत तपासणी त्वरित उपचार (ट्रेस, टेस्ट व ट्रीट अशा ट्रीपल ‘टी’) या तत्वांचा अवलंब करीत कोरोनावर नियंत्रण मिळविले जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले कि तपासणीसाठी स्वॅब दिल्यास १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागते, या भितीने नागरिक स्वॅब देण्यास घाबरतात. मात्र स्वॅब दिल्यानंतर दोन दिवसात अहवाल येईल याची मी हमी घेतो, त्यामुळे स्वॅब देण्यास घाबरु नका, असे आवाहन नागरिकांना केले आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग व मृत्यूचे प्रमाण घटविण्यासाठी राबविण्यात येणाºया संशयित रुग्ण शोध पंधरवाडा विषयी माहिती दिली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उप जिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे आदी उपस्थित होते.
स्वॅब घेण्यासाठी दोन मोबाईल व्हॅन
स्वॅबचे अहवाल येण्यास उशिर होत असल्याने बरेच रुग्ण घाबरून स्वयंस्फूर्तीने स्वॅब देण्यास पुढे येत नाही. आता मात्र तशी परिस्थिती नसून स्वॅबचे रिपोर्ट लवकर येणार असल्याने नागरिकांना जास्त वेळ विलगीकरणात राहावे लागणार नाही. त्यामुळे रुग्णांमधील भीती आणि गैरसमज दूर होणार असून नागरिकांनीही स्वॅब देण्यास घाबरू नये, अहवाल दोन दिवसात येईल याची हमी घेतो, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी नमूद केले. स्वॅब घेण्यासाठी दोन मोबाईल व्हॅन कार्यान्वित करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
बांधितांची संख्या जास्त दिसली तरी घाबरू नका
महानगरपालिका, नगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरोग्य यंत्रणा व पदाधिकार्यांच्या सहकायार्तून संशयित रुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत बाधित रुग्ण सापडण्याची शक्यता असल्याने रुग्णांची संख्याही वाढणार आहे. असे असले तरी भविष्यातील धोका कमी होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता तपासणीस येणाऱ्या यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यानी केले. कोरोना विषाणुची साथ ही आपल्या सर्वांसाठी नवीन असून आपल्याला सर्वांना एकमेकांना सहकार्य करुन कोरोनाला हद्दपार करणे अधिक सोपे होईल, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकाऱ्यानी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.मृत्यूदर होईल कमी
रुग्णाचे लवकर निदान झाले नाही तर त्याच्या मृत्यूची शक्यता बळावते. त्यामुळे या पंधरवाड्यामध्ये मृत्यूदर कमी करण्यावर भर राहणार असल्याने तत्काळ निदान होण्यासाठी तपासण्या वाढविण्यात येणार आहे. यात निदान लवकर झाल्यास त्वरीत तपासणी करण्यात येऊन त्यावर काय उपचार करणे आवश्यक आहे हे समोर येईल व त्यानुसार त्वरित उपचार मिळतील. त्यामुळे त्वरीत निदान, त्वरीत तपासणी, त्वरित उपचार (ट्रीपल टी) यावर भर दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
रुग्णालयात सुविधांवर भर व रुग्णांची काळजी
कोरोना रोखणे व मृत्यूदर कमी करण्यासाठी कोरोना रुग्णालयांमध्ये सुविधा उपलब्ध करून देत रुग्णालयाची कार्यक्षमता वाढविण्यात येत असून यात वेगाने सुधारणा होत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. या सोबतच तेथे डॉक्टरांची नियुक्ती, त्यांनी तेथे हजर राहून रुग्णांजवळ थांबणे गरजेचे असल्याचे सांगत तशा उपाययोजना यंत्रणेमार्फत राबविल्या जात असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
रुग्णांची माहिती घेणार
या पंधरवाड्यामध्ये मनपाची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे येणारे वेगवेगळ््या आजाराच्या रुग्णांची माहिती घेण्यासह प्रतिबंधित क्षेत्रातील हाय रिस्क, लो रिस्कमध्ये असणाºयांसह संशयितांचे स्वॅब घेतले जातील. यात खाजगी डॉक्टरांचीही मदत घेणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.
लॅबची क्षमता ५०० अहवालांपर्यंत नेणार
सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या लॅबमधून १७० अहवाल दररोज येत आहेत. ही क्षमता शनिवारपर्यंत ५०० पर्यंत वाढविणार असून यासाठी वाढीव उपकरणांचा वापर केला जाऊन जास्तीत जास्त अहवाल व तेदेखील वेळेत येण्यासाठी नियोजन केले जात असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. यात २४ तासात अहवाल आला पाहिजे असे उद्दीष्ट असून काही कारणास्तव उशिर झाल्यास तो अहवाल ४८ तासात आलाच पाहिजे, यावर भर राहणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी जळगाव शहरात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिका?्यांच्या संयुक्त विद्यमाने पुढील पंधरवाडा हा कोरोना रुग्ण शोध पंधरवाडा म्हणून राबवत असून नागरिकांनी कोरोना शोध मोहिमेतील यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी प्रशासन आपल्यापरीने कोरोना विषाणूला रोखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यांना आपल्या सहकायार्ची आवश्यकता असून मुख्यत्वे नागरिकांनी, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क बांधूनच बाहेर पडणे, कामाशिवाय बाहेर जाणे टाळणे आणि विशेष म्हणजे प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नागरिकांनी जाणे किंवा त्यातून बाहेर निघणे टाळावे. नागरीकांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडविल्यास कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवता येईल.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.