शिंदखेडा:भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने प्रमाणित केलेल्या कोरोना प्रतिबंधित अर्सेनिक अल्बम 30 या गोळयांचे शहराच्या विविध भागातील नागरिकांना वाटप करण्यात आले.
प्रांतिक तेली समाज युवक आघाडी, स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, श्रीजी प्रतिष्ठान,बालाजी मित्र मंडळ, जय संताजी युवा मंच व सत्यम मित्र मंडळ यांच्यावतीने शहरात लक्ष्मी नारायण कॉलनी, सिद्धी विनायक चौक, गुरव गल्ली व रथगल्ली याठिकाणी झालेल्या कार्यक्रमात समादेशक संजय पाटील यांच्या हस्ते महिलांना औषधं वाटण्यात आली.कोरोना विरोधातील लढाईमध्ये केलेल्या कामाची दखल APJ Abdul Kalam International Foundation, Rameshwaram यांनी घेतली. त्यामुळे स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाला प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास तेली समाज युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शामकांत ईशी, एसआरपीएफचे dysp सोळंखे, dysp सदाशिव पाटील, पीआय नामदेव पाटील, शिंदखेडा पो.स्टे. पीआय दुर्गेश तिवारी, गटनेते अनिल वानखेडे,नगरसेवक उदय देसले,सुषमा चौधरी, गोटन चौधरी, पंच मंडळाचे अध्यक्ष श्रीराम चौधरी, छोटू चौधरी, दीपक चौधरी, विभागीय सरचिटणीस प्रा.उमेश चौधरी, जिल्हाध्यक्ष सुनील चौधरी, शहराध्यक्ष मनोज चौधरी, तेली समाज शहराध्यक्ष निंबा चौधरी, प्रवीण जैन उपस्थित होते.
यशस्वितेसाठी कुणाल गुरव, शक्ती राजपूत, गोपाल गुरव, चेतन गुरव, दिनेश ठाकूर, राज परदेशी, अरविंद गुरव, दिनेश चौधरी, विपुल चौधरी, हितेश चौधरी, सुमित जैन, विजय विसपुते, निखिल चौधरी, आकाश चौधरी, सचिन परदेशी, दर्शन गुरव, योगेश ठाकूर, मयूर गुरव यांनी परिश्रम घेतले.