भुसावळ : जगभरात धुमाकूळ घालणार्या कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्मचे तिकीट आता दहा रुपयांवर पन्नास रुपयांवर करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या माध्यमातून अनावश्यक गर्दीला आळादेखील घातला जाणार आहे. भुसावळ विभागातील नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, खंडवा रेल्वे स्थानकावर 17 मार्च ते 15 एप्रिलदरम्यान प्लॅटफार्मच्या तिकीटात वाढ करण्यात आली. दरम्यान, रेल्वे स्थानकावर नागरीकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.