कोरोना प्रादुर्भाव : भुसावळातील पोलिसांना सॅनिटायझरचे वाटप

0

भुसावळ : कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने त्यापासून बचावासाठी शासन सर्वोतोपरी उपाययोजना करीत आहेत तर नागरीकांना घरातच थांबून राहण्यासाठी पोलिसांकडून 24 तास रस्त्यावर खडा पहारा दिला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होवू नये तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेत भुसावळातील नगरसेवक संतोष (दाढीभाऊ) चौधरी, शंकर चौधरी, व्यापारी नरेंद्र अग्रवाल (गुड्डू शेठ) तसेच अशोक (आँऊ) चौधरी यांनी भुसावळ शहर व बाजारपेठ तसेच तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांना सॅनिटायझरचे वाटप केले. याप्रसंगी उभयंतांनी पोलिसांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचीही विनंती केली.