जळगाव – जिल्हा प्रशासनातर्फे आठवडानिहाय कोरोना बाधितांचा आढावा घेतला जात आहे. मागील आठवड्यात कोरोना बाधितांचा दर हा १.८२ होता. आता त्यात आणखी घसरण झाली असुन या आठवड्याचा दर हा ०.९५ टक्के इतका आहे. कोरोना बाधितांच्या दरात घसरण होत असल्याने जिल्ह्यातील निर्बंधांमधील शिथीलता जैसे थे ठेवण्यात आली आहे.