वरणगाव : खासदार शरद पवार यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीने राज्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करणार्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचार्यांना फेस शिल्ड वितरीत करण्याचे कार्य सुरू आहे. वरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले यांच्या नेतृत्वाखाली व डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या नियोजनातून राज्यातील हजारो डॉक्टर व कर्मचार्यांना हे शिल्ड देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
वरणगावात फेस शील्ड वितरीत करताा जळगाव जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते राजेंद्र विश्वनाथ चौधरी, विष्णु नेमीचंद खोले, रवींद्र शांताराम सोनवणे, गणेश सुपडू चौधरी, समाधान जगदेव चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक हरी मराठे, शहराध्यक्ष संतोष बळीराम माळी, प्रकाश नारखेडे, युवक शहराध्यक्ष प्रशांत लक्ष्मण मोरे, रवींद्र पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.