कोरोना : बोदवडमध्ये तीन दिवसीय जनता कर्फ्यूला प्रतिसाद

0

बोदवड : कोरोनाचा फैलाव वाढतच चालल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात बुधवारपासून तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यास सुरूवात करण्यात आली. बोदवड शहरात दोन दिवसांपूर्वी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर मंगहवारी पुन्हा सहा रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाची साखळी तुटण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून बोदवड शहर बंदचे सलग आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात तहसीलदार हेमंत पाटील यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने दिनांक 10, 11 व 12 हे तीन दिवस बोदवड शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्या आला. बंदमध्ये मेडिकल, दवाखाने, कृषीकेंद्र व दूध डेअरी वगळता बाकी सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व नागरीकांनी याची नोंद घेऊन या जनता कर्फ्यूला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.