कोरोना : भारताचे जगभरात कौतूक

0

नवी दिल्ली – भारतात कोरोना बाधितांची संख्या दिवसेेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अन्य देशापेेंक्षा भारतात परिस्थिती नियंत्रणात असल्याने भारताचे जगभरात कौतूक करण्यात येत आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनात करोनाबद्दल अभ्यास करताना याविरुद्ध भारताने उचललेल्या पावलांचा आणि प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले आहे. भारताचे प्रयत्न अमेरिकेपेक्षा चांगले असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

दुसरीकडे, इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू यांनीही ट्विट करून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले. नेतान्याहू यांनी ट्विटमध्ये मोदींचा उल्लेख ‘प्रिय मित्र’ असा केला आहे. ’क्लोरोक्वीन पाठवल्याबद्दल माझे प्रिय मित्र नरेंद्र मोदींचे धन्यवाद,’ असे ट्विट नेतान्याहू यांनी केलं आहे. याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्राझीलचे अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांनीदेखील मोदींचे आभार मानले आहेत. बोल्सोनारो यांनी तर मोदींची तुलना थेट लक्ष्मणासाठी संजीवनी आणणार्‍या हनुमानाशी केली होती. बेंजामिन नेतन्याहू यांच्या ट्विटनंतर पंतप्रधान मोदींनीही ‘आपल्याला सोबत येऊन या रोगराईविरोधात लढावे लागेल. भारत आपल्या मित्रांसाठी शक्य असेल ते सर्व करण्यासाठी तयार आहे. इस्राईलच्या नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थन करतो’ असे ट्विट केले आहे.