कोरोना महामारीतही चोपडा सूतगिरणीची प्रगती

जिंनिग प्रेंसिंग उभारणीची तयारी- माजी आ.कैलास पाटील

चोपडा – येथील चोपडा शेतकरी सहकारी सूतगिरणीने कोरोना महामारीच्या काळात दिड महिना गिरणी बंद ठेवूनही उत्पादीत सुताला चांगला भाव प्राप्त झाल्यामुळे नफा मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.गेल्या कालखंडात संस्थेने नेत्रदिपक प्रगती साधली आहे.सभासद शेतकऱ्यांच्या कापसाला जास्त बाजारभावापेक्षा काही प्रमाणात जास्त दर देता यावा म्हणून सूतगिरणीत स्वतःची जिंनिग प्रेसिंग सुरु करण्याचे प्रयत्न सुरु केले असून शासकीय दरबारी कागदपत्रे पुरवून परवाग्यांचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.वित्तपुरवठा उपलब्ध होताच जिंनिग प्रेसिंगचे भुमिपूजन करण्याचा मानस सूतगिरणीचे चेअरमन माजी आ.कैलास पाटील यांनी व्यक्त केला.
माजी आ.पाटील सूतगिरणीच्या २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.सुतगिरणीची सभा अॅानलाईन पार पडली.यावेळी  संचालक तुकाराम पाटील, प्रकाश रजाळे,जनरल मॅनेजर विजय पाटील आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता.
या सभेत प्रशासकीय अधिकारी रतन पाटील यांनी संस्थेचा अहवाल,आर्थिक पत्रके वाचून दाखविली.सभेत सहा विषयांवर चर्चा करण्यात आली.संस्थेने अहवाल वर्षात ५० कोटी रूपयांपेक्षा जास्त उलाढाल केल्याचे सांगण्यात आले.
या सभेत उमेश महाजन, पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.यावेळी अनेक सभासद सहभागी झाले होते.आभार प्रदर्शन प्रकाश रजाळे यांनी केले.