मुंबई: कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज संशयित रुग्ण संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ८०० संशयित रुग्ण आढळले होते. सर्वांची तपासणी केली असता त्यातील ४० रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आले आहे. ७६० रुग्णांची टेस्ट निगेटिव्ह निघाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सरकारी कार्यालयांना सुट्टी देण्यात आली नसून ५० टक्के कर्मचारी एकावेळी हजर राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईतील जनतेला कामाव्यतिरिक्त बाहेर पडणे टाळावे, नागरिकांनी स्वत:हून सहकार्य करावे. मुंबई बंद करण्याची आवश्यकता नाही मात्र मुंबईतील जनतेने ऐकले नाही तर मुंबईतील लोकल बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिले आहे.
४ शहरांमध्ये तपासणीसाठी लॅब उभारण्यात येणार आहे. सरसकट तपासणी करण्यात येत नसून जे रुग्ण विदेशातून आले आहे त्यांचीच तपासणी करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्र्यानी सांगितले.