कोरोना : मास न लावल्याने नवापूर शहरात गुन्हा दाखल; राज्यातील पहिली घटना

0

नवापूर : देशावर कोरोनाचे संकट आहे. दिवसागणिक कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भर पडते आहे. केंद्र आणि राज्य सरकार जोमाने कामाला लागले आहेत. लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. सोशल डिस्टंसिंगचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही अनेकजण या नियमांना बगल देत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलिसांनी सुन्नटा फिरणार-यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मास्क न वापरता शहरात विनाकारण फिरताना मिळून आला इतरांना त्रास होईल, असे कृत्य केल्याने नवापूरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला नवापूर न्यायालयाने दंड करून शिक्षा देखील सुनावली असून नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलिस स्टेशन परिसरात हा प्रकार घडला आहे.शहरातील पोलिस पेट्रोलिंग करत असताना शास्त्री नगर भागात राहणार युवक जहांगीर उस्मान मिर्झा (वय 24) लाईट बाजारात मास्क न लावता विनाकारण फिरत असताना पोलीसांनी मास्क लावण्यासाठी सांगितले परंतू पोलीसांचे न ऐकता जहांगीर मिर्जा या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून नवापूर न्यायालयाने एक हजार रुपये दंड व पाच दिवसाची कोठडीची शिक्षा दिल्याने नवापूर परिसरातील मास्क न वापरता सुन्नटा फिरणार-यांवर लगाम लागणार आहे. आयपीसी 188, 269 कलमा अंतर्गत ही कारवाई करून न्यायालयाने 5 दिवसांची कोठडी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा केली आहे.