कोरोना योद्धांवरच कोरोनाचे संकट; आतापर्यंत ८ हजार पोलिसांना कोरोनाचा बाधा

0

मुंबई: जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच कोरोना योद्धा म्हणून आपली कामगिरी बजावणारे देखील आता कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. पोलीस प्रशासन कोरोना योद्धाची भूमिका बजावत आहे. महाराष्ट्रातील आतापर्यंत ८ हजार ७२२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील २४ तासात संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल १३८ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यातील ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ९७ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एएनआयने ही माहिती दिली आहे.

सध्या महाराष्ट्रात १ हजार ९५५ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहे.६ हजार ६७० पोलीस कर्मचारी यातून बरे झाले आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कायदा-सुव्यवस्था राखण्याची प्रमुख जबाबदारी पोलीस प्रशासनावर होती. गर्दीवर नियंत्रण आणण्यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. आरोग्य विभागाच्या बरोबरीने पोलीस प्रशासन काम करत आहे.