रावेर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्वतयारी म्हणून 250 बेडचे कोरोना केअर सेंटर स्थापन करण्यात येत आहे तर दोन खाजगी हॉस्पिटल अधिग्रहित करण्यात आले आहे.
माऊली व सुश्रृत हॉस्पीटल अधिग्रहीत
शहरात सामाजिक न्याय विभागाचे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह अधिग्रहित केल्यानंतर आता येथील सरदार जी.जी.हायस्कूल व सौ.कमलाबाई अग्रवाल गर्ल्स हायस्कूल व यशवंत विद्यालय व व्ही.एस.नाईक महाविद्यालयाचे वसतिगृह असे एकूण चार शिक्षण संस्थांच्या इमारती आरोग्य विभागाने अधिग्रहित केल्या आहे. या ठिकाणी सुमारे 150 बेड लावण्यात येणार आहेत. कोरोना रुग्णांची तपासणी करण्यासाठी यासाठी येथील माऊली हॉस्पिटल तर सावदा येथिल सुश्रृत हॉस्पीटल अधिग्रहीत करण्यात आले आहे.