कोरोना रुग्णसंख्येत वाढ; मुख्यमंत्र्यांकडून मोठ्या घोषणेची शक्यता

0

मुंबई: जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने पाय पसरला आहे. भारतातील सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रात आढळली आहे. दररोज रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आज शुक्रवारी नव्याने मुंबई: मुंबई, पुणे आणि पिंपरीत करोनाचे आणखी तीन रुग्ण आढळले असून राज्यातील करोना रुग्णांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. दरम्यान आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

राज्यातील करोनाच्या ५ संशयित रुग्णांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असून त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील करोना रुग्णांची माहिती दिली. राज्यातील १०३५ रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांची टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ९७१ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.