नागपूर – नागपूरमध्ये कोरोनाग्रस्तांचा चुकीचा आकडा व्हायरल करणे तिघांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
या तिघांनी मिळून एक फेक ऑडिओ तयार केला होता. त्यात नागपूरमध्ये ५९ रुग्ण सापडल्याचा दावा करण्यात आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
सायबर सेलने चौकशी करून हे प्रकरण उघडकीस आणले. तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.