कोरोना रूग्णांची संख्या घटली पण मृत्यू अधिक

आज नव्याने ९८४ रूग्ण आढळले ; २१ रूग्णांचा मृत्यू

जळगाव- गेल्या १५ दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या एक हजाराच्या पुढेच आढळुन येत होती. यात आज मात्र घट झाली असुन नव्याने ९८४ रूग्ण आढळुन आले आहे. काही अंशी जिल्हावासियांना ही निश्चीतच दिलासादायक बाब असली तरी तब्बल २१ रूग्णांचा आज मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे कळविण्यात आली आहे.
जिल्ह्यात आज ९८४ कोरोना बाधीत आढळून आले असून यात जळगाव शहरात सर्वाधिक २११ रूग्ण आढळुन आले आहेत. तर इतर जळगाव ग्रामीण ७५, भुसावळ ७८, अमळनेर ३७, चोपडा १२, पाचोरा १७, भडगाव ३४, धरणगाव ४६, यावल ६७, एरंडोल ७३, जामनेर २०, रावेर ८६, पारोळा ६, चाळीसगाव ५९, मुक्ताईनगर १५८, इतर जिल्ह्यातील ५ असे एकुण ९८४ रूग्ण आढळुन आले आहे. आज जळगाव शहरातील ७, तालुक्यातील ३, धरणगाव तालुक्यातील ३, चोपडा तालुक्यातील २, जामनेर, रावेर, भुसावळ, पाचोरा, एरंडोल आणि अमळनेर तालुक्याती प्रत्येकी एक अशा एकुण २१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३२ ते ७२ वय असलेल्या रूग्णांचा समावेश आहे. आज ११९५ रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.