कोरोना रोखण्याबाबत भिलवाडा पॅटर्नचे श्रेय लाटल्याने काँग्रेसवर भडकली महिला सरपंच

0

जयपूर – कोरोनाच्या लढाईत राजस्थानच्या भिलवाडा गावाचा पॅटर्नची देशभर चर्चा सुरु आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भिलवाडाचे कौतुक करत देशभरात भिलवाडा पॅटर्न राबवण्यासाठी माहिती मागवली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकार आणि राहुल गांधी यांना या लढाईचे श्रेय दिले त्यामुळे भिलवाडाच्या देवरिया गावच्या सरपंच किस्मत गुर्जर यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सोनिया गांधीच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. भिलवाडा पॅटर्नच्या यशामागे शेतकरी, महिला, गावकरी आणि भिलवाड्यातील स्वयसेवी संस्था यांची मेहनत असल्याचे सांगत, ही वेळ राजकीय स्वार्थ साधण्याची नव्हे तर सतर्कता आणि संयम ठेवण्याची आहे असेही त्या म्हणाल्या.

भिलवाडा गाव देशातले पहिले कोरोना हॉटस्पॉट होते. मात्र आता इथली परिस्थिती सुधारली आहे. या गावात गेल्या ८ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळून आला नाही तर सुरुवातीच्या २७ रुग्णापैकी १३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोना पूर्णपणे रोखण्यास भिलवाडा गावाला यश आले. प्रशासनाने संपूर्ण सक्तीने याठिकाणी स्किनिंग केले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. त्यामुळे याचं श्रेय लाटण्यासाठी अनेकांनी उडी घेतली आहे. किस्मत गुर्जर म्हणतात की, मागील काही दिवसांपासून राज्य सरकार यांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या लोकांनी कोरोनाशी लढण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचे पालन केले, याठिकाणी लोकांनी फक्त लॉकडाऊनचे पालन केले नाही तर सोशल डिस्टेंसिग आणि स्वच्छतेचीही काळजी घेतली, असेही त्या म्हणाल्या.