जळगाव– कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. खबरदारी म्हणून जिल्हा न्यायालयात जामीनावर होणारे कामकाजही आता व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे होणार असल्याबाबतचे आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलानी यांनी सोमवारी काढले आहेत.
मोबाईल अॅपद्वारे वकील होणार सहभागी जिल्हा सरकारी वकील, तसेच संशयिताचे वकील यांना मोबाईलमध्ये कॉन्फरन्सचे एक विशिष्ट अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. संशयितातर्फे जिल्हा न्यायालयात दिलेल्या लिंकवर जामीनअर्ज दाखल करण्यात येईल. यानंतर या अर्जावर व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे मोबाईलमधील अॅपच्या माध्यमातून सरकारी वकील तसेच संशयिताचे वकील युक्तीवाद करतील. यात न्यायाधीश सुध्दा व्हिडीओ कॉन्फरन्सने हजर राहतील. अशाप्रकारे 6 एप्रिलपासून ते लॉकडाऊनपर्यंत कामकाज होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.