कोरोना विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

0

वरणगाव : सामाजिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कोरोना विषाणूची जनजागृती होऊन उपाय योजनांची माहिती व्हावी यासाठी जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव, डॉ.एपीजे अब्दुल कलाम व डॉ.सी.व्ही.रमण विपनेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी दोन गट असून इयत्ता सहावी ते आठवी लहान गट, इयत्ता नववी ते बारावी मोठा गट असून दोन्ही गटांसाठी ‘परंपरा जपूया कोरोनाला हरवूया’, ‘कोरोना इष्टापत्ती का दृष्टापती’, ‘आजीचा बटवा कोरोनाला चकवा’ या तीन विषयावरती स्पर्धा होत आहे. मोठ्या गटासाठी चार मिनिटे व लहान गटासाठी तीन मिनिटे वक्तृत्व द्यायचे असून ही स्पर्धा ऑनलाईन झूम अ‍ॅपद्वारा घेतली जाणार आहे. स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे नोंदणी जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या ब्लॉगवर करता येणार आहे.