मुंबई: भारत देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल क्रिकेट सामने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. याबाबत आयपीएल क्रिकेट सामन्यांना बराच वेळ असून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेवू असे स्पष्ट केले आहे.