कोरोना व्हायरसमुळे एका दिवसात ८६ मृत्यू !

0

बीजिंग: चीन मध्ये कोरोना व्हायरसने कहर केला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे ७२२ लोक मृत्युमुखी पडले असून एकूण ३४ हजार, ५४६ नागरिकांना त्याची लागण झाली आहे. चीनमध्ये शुक्रवारी ७ फेब्रुवारी रोजी एका दिवसात तब्बल ८६ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसची लागण ३० देशांतील १५० लोकांना लागण झाली आहे. संसर्ग होऊ नये, यासाठी चीनने दोन राज्यांतील लोकांना अन्य राज्यांमध्ये जाण्यास बंदी घातली आहे.

एअर इंडिया, इंडिगोसह अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी चीनला जाणारी आपली विमाने काही दिवसांसाठी रद्द केली आहेत. सध्याच्या काळात चीनला जाणे टाळा अशा सूचना भारतासह अनेक देशांनी आपापल्या नागरिकांना दिल्या आहेत. जपानच्या समुद्रात नांगरून ठेवलेल्या डायमंड प्रिन्सेस नावाच्या क्रूझमध्ये कोरोनाची लागण झालेल्या प्रवाशांची संख्या आता ६१ झाली आहे.

कोरोना विषाणूची चीनमध्ये मोठ्या प्रमाणात लागण झाल्यानंतर तेथून विशेष विमानाने दिल्लीत आणलेल्या ६४० पैकी एकाही भारतीयाला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. त्यामुळे त्या विषाणूचा भारताला धोका कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या सर्वांना आणखी काही दिवस एकांतवासामध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी पाठवण्याचा निर्णय होईल.