कोरोना व्हायरस: इराणमधील २३६ भारतीय मायदेशात दाखल

0

नवी दिल्ली: कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातला आहे. भारतातही याचा फैलाव होत आहे. अनेक भारतीय परदेशात अडकले आहेत. त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहे. दरम्यान इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यात यश आले आहे. २३६ भारतीय मायेदशी परतले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जय शंकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. २३६ जणांमध्ये १३१ विद्यार्थी आहेत आहेत.

शुक्रवारी ४४ प्रवाशांना इराणहून भारतात आणले गेले. त्यानंतर आतापर्यंत एकूण २३६ भारतीयांना इराणहून भारतात आणण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराण सरकार आणि भारतीय दुतावासाचे आभारही मानले आहेत. इराणमध्ये करोना व्हायरसमुळे १०० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे तिथे गेलेले भारतीय हे मायदेशी परतण्याच्या चिंतेत होते. मात्र अखेर त्यांची ही चिंता मिटली आहे.