कोरोना संशयित नवीन १९ रुग्ण रुग्णालयात दाखल

0

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वृध्दाच्या संपर्कातील १५ जणांच्या अहवालाची प्रतिक्षा कायम : रत्नागिरिच्या ‘त्या’ दोघांचेही नमुने तपासणीसाठि रवाना

जळगाव– जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी नवीन कोरोना संशयित १९ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. संबंधित सर्वांचे नमुने तपासासाठी पाठविण्यात आले अाहे. या १९ जणांमध्ये रत्नागिरीच्या जळगावात वास्तव्य असलेल्या त्या दोघांचाही समावेश असुन त्यांना शाहु महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोरोना पॉझिटिव वृद्धाचा गुरुवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या वृद्धाच्या अतिशय जवळून संपर्कात आलेल्या कुटुंबीयांसह त्याचे नातेवाईक अशा १५ जणांना गुरुवारी कोरोना संशयित म्हणून महापालिकेच्या शाहू महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे नमुने तपासणीसाठी धुळे येथे पाठविण्यात आले असुन अद्यापही त्यांचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. तसेच गुरुवारी नवीन इतर पाच कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले होते यात तीन जणांचा निगेटिव्ह आला आहे. कोरोणाने मृत्यू झाल्याने वृध्दाच्या संपर्कातील १५ जणांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

कोरोना संशयित रुग्णांची संख्या वाढतेय

जळगाव शहरात कोरोना या विषाणूचा संसर्ग झालेले २ रुग्ण आढळून आलेले आहे. त्यापैकी एकाचा गुरुवारी मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २४७२ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यात शुक्रवारी १७८ रुग्णांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत एकुण ११७ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी ७७ जणांचे तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तपासणीचे काल व आज अशा सर्व एकुण ३६ अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. तर दोन रुग्णांचे नमुने रिजेक्ट करण्यात आले होते . अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

रत्नागिरिच्या दोघांचेही नमुने घेतले

दिल्लीहून परतल्यानंतर जळगावातील पिंपळा परिसरात वास्तव्यास असलेल्या रत्नागिरीच्या दोन जणांना रामानंदनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री पकडले. त्यांना जिद्द जिल्हा रुग्णालयाच्या स्वाधीन ही करण्यात आले होते. या दोघांना कोरुना संशयित म्हणून शाहू महाराज रुणालयात दाखल करण्यात आल्या असून त्याचेही नमुने घेण्यात येऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत . दिल्लीहून परतलेल्या असल्याने या दोघांच्याही अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .