27 तपासणी अहवालाची प्रतिक्षा
जळगाव- जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून दाखल होणार्या रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्हा रुग्णालयात आज नव्याने 15 कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. दरम्यान नमुने पाठविण्यात आलेल्या 27 जणांच्या तपासणी अहवालाची प्रतिक्षा कायम आहे.
कोरोना रुग्णालयात आतापर्यंत 162 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 131 जणांचे अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. तर 27 जणांची तपासणी अहवाल अद्याप येणे बाकी आहे. आतापर्यंत 2889 जणांची स्क्रीनिंग तपासणी करण्यात आली आहे. तसेच आज नव्याने 15 संशयित रुग्ण रूग्णालयात दाखल झाले असल्याचेही डॉक्टर भास्कर खैरे यांनी कळविले आहे. दरम्यान काल मृत्यू झालेल्या बालिकेसह दोन महिला अशा तिघांचा अहवाल उशीरापर्यंत प्राप्त झालेला नव्हता. या अहवालाची अद्यापही प्रतिक्षा असल्याची माहिती डॉ. भास्कर खैरे यांनी दिली.