नवी दिल्ली: जगभरात कोरोना हाहाकार माजवला आहे. संख्या दररोज वाढत आहे. भारतातील संख्या चारशेच्या जवळपास पोहोचली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व खाजगी आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत, शासकीय अस्थापनांमध्येही केवळ ५ टक्केच कर्मचारी उपस्थित ठेवण्यात येत आहे. न्यायालयातील कामकाजांनाही ब्रेक लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच अशी एक गोष्ट होत आहे, ती यापूर्वी कधीही घडली नव्हती. सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांची सुनावणी प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने याची तयारी केली आहे. उच्च न्यायालये, जिल्हा न्यायालयांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
काल देशभरात जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. त्याला अपेक्षित प्रतिसादही लाभला.