कोरोेनाच्या संकटातही पाकिस्तानच्या उचापती

0

भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड

नवी दिल्ली : संपूर्ण जगला करोना व्हायरसने ग्रासले असले तरी पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया सुरुच आहेत. शुक्रवारी कुपवाडातील केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करण्यासाठी दहशतवाद्यांकडून भारतीय दलावर गोळीबार करण्यात आला. याला प्रत्यूत्तर देताना भारताकडून दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी जवळपास ११ वाजता पाकिस्तानने कुपवाडाच्या केरन सेक्टरवर सीझफायरचे उल्लंघन केले. याला भारतीय लष्कराकडून प्रत्यूत्तर देण्यात आले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा गोळीबार दोन्ही बाजुंनी सुरू होता. यावेळी, भारतीय लष्कराने सीमारेषेच्या पलिकडच्या दहशतवाद्यांच्या लॉन्च पॅडला निशाणा बनवले. सोबतच दहशतवाद्यांचे दारुगोळ्याची कोठारेही उद्ध्वस्त करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार सीझफायरचे उल्लंघन केले जात आहे. यासोबतच भारतात दहशतवाद्यांच्या घुसखोरीचाही प्रयत्न सुरू आहे.