कोर्टाचा निकाल लागेपर्यंत कारवाई करू नका – आलोकनाथ

0

मुंबई : विन्टा नंदाने सिन्टामध्ये आलोकनाथविरूद्ध केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी प्रकरनात आलोकनाथने आता सिंटाला उत्तर दिलं आहे. हे प्रकरण कोर्टात दाखल असून या खटल्याचा निकाल लागेपर्यंत माझ्यावर कोणतीच कारवाई करू नका अशी मागणी आलोकनाथने सिन्टाकडे केली आहे.

लेखिका विन्टा नंदा हिने काही दिवसांपूर्वी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अभिनेता आलोकनाथवर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अनेक अभिनेत्रींनीही अशाच प्रकारचे आरोप केले. सिन्टाने विन्टा नंदाला आलोकनाथविरूद्ध तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार विन्टा नंदा यांनी तक्रार केली. दरम्यान आलोकनाथ यांनी कोर्टात नंदा विरूद्ध मानहानीचा दावा दाखल केला. आता सिन्टाने कोणतीच कारवाई करू नये तसंच सदस्यत्व रद्द करू नये म्हणून आलोकनाथने ही विनंती केली आहे.