कोर्टाच्या आवारातून आरोपी पसार

0

नंदुरबार। खून व मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी गुन्हेगार तळोदा कोर्टच्या बाहेर पोलिसांचे हात झटकून पसार झाला. सविस्तर वृत्त असे की अक्कलकुवा तालुक्यातील बीजरीगव्हांण येथील खोजल्या वन्या तडवी यांच्यावर तळोदा अक्कलकुवा रस्त्यावर काही दिवसांपूर्वी एक खून केल्याचा आरोप असून त्याच बरोबर एक दुचाकी चोरीचा गुन्हात देखील तो आरोपी आहे. दरम्यान दुपारी 12.15 च्या सुमारास त्यास तळोदा कोर्ट हजर करण्यासाठी नंदुरबार येथून आणण्यात आले होते.

मात्र काही कारणास्तव पुन्हा शहादा न्यायालयात हजर करण्यासाठी जात असताना कोर्टाच्या समोर सदर आरोपीने हथकडी लावत असतांना पोलिसांचे हात झटकून पसार झाला. त्याचा पो. कॉ. संजू सोनवणे यांनी पाठलाग केला व आरडाओरड केली. मात्र आरोपी पसार होण्यास यशस्वी झाला. याबाबत संजू सोनवणे यांनी तळोदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास दाभाडे करीत आहेत