बारामती । बारामती तालुक्यातील कोर्हाळे खुर्द या ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराची अवघ्या पंधरा दिवसात सखोल चौकशी करण्यात येईल तसेच एमबी व इस्टिमेटप्रमाणे कामाची चौकशी करण्यात येईल असे लेखी आश्वासन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी दिले होते. बाळासाहेब खोमणे व इतर ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणावेळी हे आश्वासन दिले होते मात्र आता तब्बल वीस दिवस उलटूनदेखील कोणत्याही प्रकारची चौकशी केली जात नाही व चौकशीची टाळाटाळ केली जात आहे म्हणून बाळासाहेब खोमणे यांनी पंचायत समितीला स्मरणपत्र पाठवून चौकशीची आठवण करून दिली आहे.
दरम्यान, 27 मार्च रोजी दिलेल्या कारवाईच्या पत्राची ग्रामविकास अधिकारी यांनी अवहेलना केलेली असून कारवाईबाबत केलेली टाळाटाळ ही गंभीर बाब असून आपण याबाबत गंभीरपणे दखल न घेतल्यास पुन्हा लोकशाही मार्गाचा अवलंब करून आत्मदहनासारखा पर्याय स्विकारावा लागणार असे दिसते आहे. म्हणून आपणास हे स्मरणपत्र देत आहे. असे बाळासाहेब खोमणे यांनी पत्रात म्हटले आहे.
मुलभ्ाूत हक्कापासून डावलले जात आहे
दरम्यान अजित खोमणे यांनीही ग्रामविकास अधिकारी यांना पत्र लिहून सांगितले की, भ्ाूमिगत गटार योजनेमध्ये चेंबरची मागणी करूनदेखील अद्यापही चेंबर उपलब्ध केलेले नाहीत. मी या गावचा रहिवासी असून 4 जून 2014 रोजी ग्रामविकस अधिकारी यांना चेंबर उपलब्ध करून देणयासाठी लेखी पत्र दिलेले होते परंतु आजतागायत गावातील राजकीय व्देषामुळे मला ग्रामविकास अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार व चेंबर उपलब्ध केलेले नाही यामुळे मला माझ्या मुलभ्ाूत हक्कापासून डावलले जात आहे. असेही या पत्रात म्हटले आहे.
घंटानाद आंदोलनाचा ईशारा
माझ्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्यानंतर मी उपोषण मागे घेतले येत्या पाच दिवसात कार्यवाही न केल्यास नाईलाजाने बाबासाहेब आंबेडकर(दि.14) यांच्या जयंतीनिमित्त लोकशाही मार्गाने घंटानाद अंदोलन करणार. अन्यथ: अन्य लोकशाही मार्गही माझ्यासमोर उपलब्ध आहेत तरी आपली खोटी आश्वासने आम्हा ग्रामस्थांना त्रासदायक ठरत आहेत. ग्रामपंचायतीच्या मोठया गैरव्यवहारावर पांघरून घातले जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. म्हणूनच पुन्हा एकदा लोकशाही मार्गाने लढा देण्याची तयारी असल्याचे बाळासाहेब खोमणे यांनी सांगितले.