कोलकाताचा दिल्ली डेअरडेव्हिल्सवर शानदार विजय

0

कोलकाता- कोलकाता संघाने स्पर्धेतील आपल्या चौथ्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सवर मोठा विजय मिळवला. कोलकाताने सोमवारी आयपीएलमध्ये शानदार दुसरा विजय संपादन केला. ईडन गार्डनवर कोलकाता नाइट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २०० धावांचे लक्ष्य दिल्ली डेअरडेव्हिल्सला देण्यात आले होते. मात्र, २०१ धावांच्या डोंगराएवढया लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सचा डाव १२९ धावांवर संपुष्टात आला.

सामनावीर नितीश राणाच्या (५९) झंझावाती अर्धशतकानंतर आंद्रे रसेल १२ चेंडूत ४१ धावा आणि रॉबिन उथाप्पा ३५ धावा यांच्या कुलदीप यादव (३/३२) व सुनील नरेनने (३/१८) केलेल्या धारदार फलंदाजी व गोलंदाजीच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने या क्षेत्रामधील दुसरा सामना जिंकला. गौतम गंभीरच्या दिल्लीकडून गंभीरने ७ चेंडूमध्ये ८ धावा रिषभ पंत २६ चेंडूत ४३ धावा आणि ग्लेन मॅक्सवेल २२ चेंडूत ४७ धावा यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले. यामध्ये घरच्या मैदानावर खेळताना कोलकाताने दिल्लीचा ७१ धावांनी पराभव करीत विजय मिळविला.