कोलकाता: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा आज कोलकातामधील रोड शो झाला. यात मोठा राडा झाला. यावेळी वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली आहे.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांना भाजपा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करावा केला. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शेवटच्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज कोलकाता येथे रोड शोचे आयोजन केले होते.