कोलकात्यात फायनल

0

कोलकाता । 17 वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करण्याचा मान कोलकात्याला मिळाला आहे.  नवी मुंबईतील डी. वाय.पाटील स्टेडियम आणि गुवाहाटीला या महत्त्वाकांक्षी स्पर्धेच्या उपांत्य लढती होणार आहेत. भारतात प्रथमच फुटबॉलची विश्वचषक स्तरावरील स्पर्धा होत आहे. 6 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा भारतात होणार आहे.कोलकात्यातील विवेकानंद युवा भारती क्रीडांगण या 85 हजार प्रेक्षकक्षमतेच्या स्टेडियममध्ये स्पर्धेचा अंतिम सामना रंगेल. त्याशिवाय, या मैदानावर तिसर्‍या क्रमांकाचा सामना व उपांत्यपूर्व फेरीत, उपउपांत्यपूर्व फेरी व फ गटातील सहा सामन्यांचे आयोजनही करण्यात येईल.फिफा  पथकाने नुकतीच भारतातील स्टेडियम्सची पाहणी केल्यानंतर या स्पर्धेचे वेळापत्रक व स्थळांची घोषणा करण्यात आली.