कोलकात्यात विरोधकांचे शक्तिप्रदर्शन; वीस प्रमुख पक्षांचे नेते होणार सहभागी

0

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या संयुक्त भारत मेळाव्यातून देशभरात प्रबळ संदेश जाईल, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. कोलकात्यात आज शनिवारी होणाऱ्या ममता बॅनर्जींच्या या शक्तिप्रदर्शनात देशभरातील वीस प्रमुख पक्षांचे अव्वल नेते सहभागी होणार आहेत.

देशभरातील विविध पक्षांचे नेते होणार सहभागी

तृणमूल काँग्रेसची ही संयुक्त विरोधी पक्षांची सभा एतिहासिक ब्रिगेड परेड मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या सभेत अखिलेश यादव (सप), सतीश मिश्रा (बीएसपी), शरद पवार (एनसीपी), चंद्राबाबू नायडू (टीडीपी), एम. के. स्टालिन (डीएमके), एच.डी. देवेगौडा आणि त्यांचे पुत्र कुमारस्वामी (जेडीएस), मल्लिकार्जुन खरगे, आमि अभिषेक मनु सिंघवी (काँग्रेस), अरविंद केजरीवाल (आप), फारूख अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स), तेजस्वी यादव (आरजेडी), अजीत सिंग आणि जयंत चौधरी (आरएलडी), हेमंत सोरेन (जेएमएम),. शरद यादव (लोकतांत्रिक जनता दल) आदी नेते उपस्थित राहणार आहेत. यांपैकी बहुतेक नेते कोलकात्यात दाखल झाले आहेत. कोलकात्याच्या ऐतिहासिक ब्रिगेड मैदानावर होत असलेल्या या मेळाव्यास सुमारे दहा लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.