कोल्डड्रिंक्स, चॉकलेट फस्त करत चोरट्यांचा लाखोंच्या ऐवजावर डल्ला

0

जळगाव । शहरातील मोहननगरात बंद घर असल्याची संधी साधत घराचे कुलूप तोडून घरफोडी केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान, चोरट्यांनी घरातील लाकडी कपाटाचे दरवाजे तोडून त्यातील 36 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने 1 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात सोमवारी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंरतू, गेल्या 29 दिवसात शहरात 16 घरफोड्या झाल्या असल्याने पोलिसांपुढे घरफोडी उघड करण्याचे आवाहन समोर ठेवले आहे.

मंधाण कुटूंबिय गेले होते नातेवाईकाच्या लग्नाला
धर्मेंद्र भय्या यांचा मोहननगरातील प्लॉट क्रंमाक 110 हा त्यांचा मालकीचा आहे. परंतू त्यात खालच्या मजल्यावर नितीन नंदलाल मंधाण (वय 36) हे त्यांच्या कुटुंबियांसह राहतात. त्यांचा ईच्छादेवी चौकात एनएन सन्स नावाने ट्रेडींगचा व्यवसाय आहे. 26 मे रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास ते पत्नी सोनिया आणि मुलगा युगल यांच्यासह अमरावती येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी निघून गेले होते. मात्र, त्यांनी घरकाम करणारी राजश्री नावाच्या मुलीकडे घराची चावी देऊन गेले. 27 मे रोजी 6.30 वाजेच्या सुमारास काम करून राजश्री घराला कुलूप लावून निघून गेली.

कपाटाचे दरवाजे तोडले
रविवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास ती घराची साफ सफाई करण्यासाठी आली. त्यावेळी घराच्या मुख्य दरवाजाला लावलेली दोन्ही कुलपे जागेवर नव्हती. घराचा दरवाजा उघडाच होता. घरात जाऊन बघितले. तर बेडरुममधील लाकडी कपाटाचे दरवाजे तोडलेले दिसले. त्यानंतर त्यांच्या बाजुला राहणार्‍या सुहास साहेबराव पाटील यांनी नितीन मंधाण यांना मोबाइलवरून चोरी झाल्याची माहिती दिली. रविवारी सायंकाळी 7 वाजता मंधाण परत आले. त्यावेळी त्यांनी घरात जाऊन बघितले. तर एका लाकडी कपाटाचे दरवाजे तोडून चोरट्यांनी लॉकरमधून दुसर्‍या कपाटाची चावी घेऊन ते उघडले. त्यात ठेवलेले 94 हजार रुपये किमतीचे 36 ग्रॅम वजनाने सोन्याचे दागिने तसेच 6 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे.

कोल्डड्रिंक्ससह चॉकलेटवर ताव
मोहननगरातील चोरीत चोरट्यांनी फ्रिजमध्ये ठेवलेल्या कोल्डड्रिंक्सची बाटली काढून ते प्यायले. कोल्डड्रिंक्स पिऊन झाल्यानंतर बाटली ओसरीतील भिंतीवर ठेवली. कोल्डड्रिंक्स पिल्यानंतर चोरटे त्यावर न तांबता त्यांनी फ्रिजमध्ये ठेवलेले चॉकलेटही चोरट्यांनी फस्त केले आहे. दरम्यान, सकाळी पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी देखील केली आहे. सतेच याप्रकरणी मंधाण यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिओमनगरातही चोरीचा प्रयत्न
शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हरिओमनगरातील अरूण मुरलीधर पाटील यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न झाला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. मात्र, पाटील यांच्याशी संपर्क होवू न शक्याने किती ऐवज गेला हे समजू शकले नाही