कोल्हापुरातील पूरपरिस्थिती बिकट; ५० हजार कुटुंबीयांचे स्थलांतर

0

कोल्हापूर: मुसाळधार पावसाने कोल्हापूर शहरात अक्षरश: थैमान घातले आहे. धरणांतून होणारा विसर्ग आणि नद्यांनी धारण केलेल्या रुद्रावतारामुळे पुराच्या पाण्याने निम्मे शहर व्यापले आहे. कोल्हापुरात निर्माण झालेली पूरस्थिती गंभीर बनली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तब्बल ५० हजारहून अधिक कुटुंबीयांनी कोल्हापूरातून स्थलांतर केले आहे. ही परिस्थिती अजूनही बिकट बनण्याची शक्यता असून याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलवून यंत्रणांना सूचना केल्या आहे.