कोल्हापुरातील महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी !

0

कोल्हापूर: राज्यात काही दिवसांपूर्वी कोल्हापूर आणि सांगलीत पावसाने थैमान घातले होते. यामुळे अनेक नागरिक बेघर झाले होते. शेतीचे पूर्ण नुकसान झाले होते. दरम्यान कोल्हापुरातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांच्याकडे शेती नाही त्यांना तीनपट नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार असून शेती नसलेल्यांन तीनपट नुकसान भरपाई खात्यात जमा होणार आहे, खात्यात रक्कम होणार आहे. आठवड्याभरात नुकसान भरपाई आणि कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.