कोल्हापूर – अंबाबाई मंदिरात महिलांना गाभारा प्रवेशावेळी आम्ही परिधान केलेल्या चुडीदार गणवेशाला या पुजार्यांनी विरोध दर्शविला. त्यावेळी भाडोत्री गुंडाकरवी या पुजार्यांनी माझ्यावर हल्ला केला, शिवीगाळ केली. या पुजार्यांनीच आता अंबाबाई देवीला साडीऐवजी घागरा-चोली गणवेश घातला. ही पुजार्यांनी मनमानी मोडीत काढली पाहिजे. त्यामुळे या मंदीरातील पुजारी हटाव मोहिमेल भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पाठिंबा दिला.