कोल्हापूर:पूरस्थितीमुळे गेल्या महिन्यात कोल्हापुरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पुराच्या पाण्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते.आता पुन्हा कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील 67 बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी, कोयनामधून पाण्याचा विसर्ग सुरू असून, अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पुराची भीती आहे.पंचगंगा नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर आहे. त्यामुळे संभाव्य पूरबाधित गावांमधील नागरिकांचे स्थलांतर करण्याची तयारी प्रशासनाने सुरू के ली आहे.
पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर हे सात बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे व तारळे हे पाच बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. तुळशी नदीवरील बीड, आरे व बाचणी हे तीन बंधारे देखील पाण्याखाली आहे. कासारी नदीवरील करंजफेण, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ- तिरपण, ठाणे-आवळे व यवलुज हे सहा बंधारे आणि कुंभी नदीवरील शेणवडे, कळे (खा), वेतवडे, मांडुकली, सांगशी व कातळी हे सहा बंधारे, तसेच धामणी नदीवरील सुळे व आंबर्डे हे दोन बंधारे पाण्याखाली आहेत. वारणा नदीवरील चिंचोली, माणगांव, कोडोली, चावरे, मांगले सावर्डे, तांदूळवाडी, शिगाव, खोची व दानोळी हे नऊ बंधारे, कडवी नदीवरील सवते सावर्डे, शिरगाव, कोपार्डे व बाचणी हे चार बंधारे आणि दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सिंध्दनेर्ली, सुळकुड, बाचणी, क सबा वाळवे, तुरंबे आणि सुळंबी हे सात बंधारे पाण्याखाली आहेत. वेदगंगा नदीवरील कुरणी, सुरुपली बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, शेळोशी आणि वाघापूर हे आठ बंधारे, हिरण्यकेशी नदीवरील खंदाळ, ऐनापूर, गिजवणे व निलजी हे चार बंधारे आणि घटप्रभा नदीवरील तारेवाडी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे आणि आडकुर हे चार बंधारे पाण्याखाली आहेत. ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी व हल्लारवाडी असे एकूण 67 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
Prev Post