कोल्हापूर: सामाजिक ऐक्याचा संदेश देणार्या राजर्षी शाहू महाराजांची जयंती सोमवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राजर्षींच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
कोल्हापूरमधल्या कसबा बावड्यातल्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये म्हणजेच शाहू जन्म स्थळावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अनेक नेत्यांनी शाहू राजांना अभिवादन केले. सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हा प्रशासनामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोल्हापूरच्या महापौर हसनी फरास, जिल्हाधिकारी, जिल्हापोलीस प्रमुख यांच्यासह शाहू प्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.