अमळनेर : पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री गांवा लगत कोल्हापुरी बंधारा बांधण्याबाबत 18 जानेवारी रोजी अमळनेर येथील बाजार समितित आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री तथा महसूल मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील व जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांना निवेदन देण्यात आले. सदरचे निवेदन देतेवेळी जिजाबराव विक्रम पाटील, संजीव अमृत काटे, गिरीष रामकृष्ण काटे, मछिन्द्र साहेबराव पाटील, पंडित हनुमंत काटे, अनिल जिजाबराव काटे, गुलाब दिनकर काटे, प्रवीण नानाभाऊ काटे, विश्वनाथ राजधर काटे, गणेश रमेश पाटील आदि उपस्थित होते.
इतर गावांनाही होणार फायदा
सदरचे निवेदन आमदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नाने आजपर्यंत लघुसिंचन विभाग मार्फत सर्वे होवून त्या कामाचे अंदाजपत्रक देखील तयार होवून जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव नियोजन समिती यांच्याकडे 1 जून 2017 रोजी सादर केले आहे. मात्र आज पावेतो मंजूरी न मिळाल्यामुळे कोळपिंप्रि ग्रामस्थांनी निवेदन दिले. कोळपिंप्रि गांवालगत कोळपिंप्रि ता. पारोळा, मंगरुळ व शिरूड ता.अमळनेर या गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी आहेत व गावालगत बंधारा झाल्यास सुमारे 7 ते 8 गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटनार आहे. तसेच गेल्या 3 ते 4 वर्षापासून पर्जन्यमान अत्यल्प कमी आहे व भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे तरी तात्काळ बंधारा बांधन्यास मंजूरी मिळावी असे निवेदनात म्हटले आहे.